भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें

amhan kelen gunavant | ten uchit rakhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥१॥ तुम्हांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥ दासांचें तें देखों नये । उणें काय होईल तें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥