भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक

amhan katha avashyak | yer sampadun laukik

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥१॥ जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ध्रु.॥ व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥२॥ कवतुकें वावरें । तुका म्हणे त्या आधारें ॥३॥