भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते

amhan ekavidha punya sarvakal | charanakamal svamiche te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥१॥ चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥ दुजिया पासाव परतलें मन । केलें द्यावें दान होईल तें ॥२॥ तुका म्हणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही ॥३॥