भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी

amhan anand jhala amhan anand jhala | devochi dekhila dehamaji

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥ देखणें ऊडालें पाहणें लपालें । देवे नवल केलें देहामाजी ॥२॥ मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥ चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥