भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें

amachi jodi te devache charan | karaven chintan vithobachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥ उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥२॥ तुका म्हणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥३॥