भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा

amacha tun runi thayincha chi deva | magavaya theva alon dara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥ वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥ बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥२॥ तुज मज सरी होईल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥३॥ भांडवल माझें मिरविसी जनीं । सहस्त्र वोवनी नाममाळा ॥४॥ तुका म्हणे आम्ही केली जिवें साटी । तुम्हां आम्हां तुटी घालूं आतां ॥५॥