भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलियाचा संतोष गेलियाची हानी

aliyacha santosh geliyachi hani

आलियाचा संतोष गेलियाची हानी । त्याचा अतिसो वेंचे तयाची काहणी ॥ ऐसे संकल्प नाहीं विकल्प देहीं वरि वरि मुंडिलिया होय कांही । तरि बहुरुप्याच्या ठाई काईं काई नटु नसे रया ॥१॥ आधीं भीतरी दंडावा पाठी बाहिजु मुंडावा । नाहीं तरी योगभांडिवा कां करिसी रया ॥ध्रु०॥ मागितलीया भीक जरि होय निर्दोष । तरि सणिये रजक काय न मागती ॥ देवपणें फ़ुग धरिसील गाढा । तरी वायाविण मूढा सिंतरलासी ॥२॥ थिगळी घालोनि गळां म्हणसी न भियें कळिकाळा । तरि काय कर्मा वेगळा कै हो पाहासी ॥ योगिया म्हणिजे कैसा भीतरी काश्मिरी जैसा । मीनालिया पदार्थासरिसा होउनी मिळे ॥३॥ ह्रदयीं नाहीं जालेपण क्रोधें भवंडिसी लोचन । अंगीं भस्मउधळण राख राखेल काई ॥ खर लोळे उकरडां काय परत्रचिया चाडा । तैसा मठीं बांधोनि मूढा वर्म चुकलासी ॥४॥ तीर्थव्रत-जपस्नान वाउगें करिसी ध्यान । ऐसें करितां आने आन मार्ग चुकलासी ॥ शुध्द करुनियां मन सेवी निवृत्तीचे चरण । विठ्ठलविठ्ठल म्हण नाहीं तरी नाडलासी ॥५॥