भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा

aliya sansara utha veg kara | sharan ja udara panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥ देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥ निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥ तुका म्हणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥४॥