भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां

aliya bhogasi asaven sadar | devavari bhar ghaluniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥ मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंक ॥ध्रु.॥ भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥२॥ तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥३॥