भजनी मालिका
← भजनांकडे परत

आली सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन

ali salagi payampashin | hoil taisi karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आली सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥ आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव उरलासे ॥२॥ तुका म्हणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥