भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे

alen dharayach pet | pudhen maguten na bhete

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥ नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥ध्रु.॥ होसी फजीती वरपडा । लक्ष चौऱ्यांशीचा वेढां ॥२॥ एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥३॥ जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥४॥ तुका म्हणे हित पाहें । जोंवरी हें हातीं आहे ॥५॥