भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों

ale sant pay theviti mastakin | yehin ubhayalokin sarata kelon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥ अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥२॥ तुका म्हणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥३॥