भजनी मालिका
← भजनांकडे परत

आळस पाडी विषयकामीं । शक्ती देई तुझ्या नामीं

alas padi vishayakamin | shakti dei tujhya namin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आळस पाडी विषयकामीं । शक्ती देई तुझ्या नामीं॥१॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणीं ॥ध्रु.॥ हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥२॥ तुका म्हणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥३॥