भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं

ala bhagasi to karin vevasav | pari raho bhav tujhya payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥ काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥ शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥२॥ चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥ इंद्रियें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥४॥ तुका म्हणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुलती म्हणऊनि ॥५॥