भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं

akarin nahin ten nirakarin pahin

आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं । निराकारीं राही शून्याशून्य ॥१॥ जेथें शून्यचि मावळलें तेथें काय उरलें ॥ हेचि सांगे एके बोलें मजपासीं ॥२॥ शून्य कासय पासाव जालें शून्य तें कवणें केलें । हें सांगिजोजि एक्या बोलें गुरुराया ॥३॥ आपण शून्याकार कीं आपण निराकार । आकार निराकार मूर्तिमंत दाऊं ॥ आकार निराकार ये दोन्हीं नाहीं । तेंचि तूं पाही आपणापें ॥४॥ जेथें अनुभवचि नाहीं तेंचि तूं पाही । स्वानुभवीं राही तुझा तूंचि ॥५॥ जेथें चंद्र सूर्य एक होती तेथें कैचि दिनराती । ऐसें जे जाणती ते योगेश्वर ॥६॥ कर्माकर्म पारुषलें देवधर्म लोपले । गुरुशिष्या निमाले जाले क्षीरसिंधु ॥७॥ तेथें गोडीवीण चाखणे । जिव्हेवीण बोलणे नेत्रेंविण पाहणें तेंचि ब्रह्मा ॥८॥ हातीं घेऊनियां दिवटी लागिजे अंधारापाठीं । अंधार न देखे दृष्टी उजियेडु तो ॥९॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु देखणा । दृष्टयद्रष्टेपणा माल्हावले ॥१०॥