भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी संसार सुफळ जाला गे माये

aji sansar suphal jala ge maye

आजी संसार सुफळ जाला गे माये । देखियले पाय विठोबाचे ॥ तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळों वेळां व्हावा पांडुरंग ॥ बापरखुमादेविवरू न विसंबे सर्वथा । निवृत्तीने तत्त्वतां सांगितले ॥