भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें

aji naval mi alen yene ranen | bheti avachiti nandachiya kanhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥१॥ गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं । अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ध्रु.॥ बहुत कामें मज नाहीं आराणूक । एक सारितां तों पुढें उभें एक । आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥२॥ चिंता करितां हरीली नारायणें । अंगसंगें मिनतां दोघेजणें । सुखें निर्भर झालियें त्याच्या गुणें । म्हणे तुका खुंटलें येणें जाणें वो ॥३॥