भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्तीं

aji ka vo tun disasi dushchiti | mhaniye kam na lage tujhya chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजि का वो तूं दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरी चित्तीं वो ॥१॥ सर सर परती झालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं झाला खंड वो ॥धृ ॥ होते तैसे उमटले वरी । बाह्य संपादनी अंतरीची चोरी । नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदी देह काम करी वो ॥२॥ नाही करीत उत्तर कोणा सवे । पराधीन भोजन दिले खावे । नाही अचल सावरावा ठावे ।देखो उदासीन तुझे गे देह भाव वो ॥३॥ कोठे नेणो हा फावला एकांत । सदा किलकील भोवती बहुत । दोघे एकवत बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४ ॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासू सुना । पराभक्ती हे शुध्द तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे या जना वो ॥५ ॥