भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसीं वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली

aisin varmen amhan asoniyan hatin | kan houn nenatin dishabhuli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसीं वर्में आम्हां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥ पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा झालों नेदीं ॥ध्रु.॥ आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥२॥ तुका म्हणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥३॥