भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास

aisi jodi kara ram kanthin dhara | jenen chuke phera garbhavas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥ नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥ नाव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥ तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरीरामबाणीं ॥३॥