भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी

aisi jivha niki | viththal viththal kan na ghoki

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥ जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥ गुंपोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥ तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥३॥