भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां

aisen thaven nahin mudha | sos kakulati pudhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥१॥ माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥ पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥२॥ संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥ परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥ तुका म्हणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥५॥