भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या

aisen kan ho na kara kanhin | pudhen nahin nas jya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥ विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥ श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥२॥ तुका म्हणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी ॥३॥