भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा

aise kulin putra hoti | budaviti purvaja

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥ चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥ त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥ तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुष्या ॥३॥