भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू

aise aisiyanen bhetati te sadhu | jyanchya darshane tute bhavabandhu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू । जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥ भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु । भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥ अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥