भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें

aisa jyacha anubhav | vishva dev satyatven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥१॥ देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणें ॥ध्रु.॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥२॥ तुका म्हणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥३॥