भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा घेई कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास

aisa ghei kan re sannyas | karin sankalpacha nas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा घेई कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास ॥१॥ मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोई ॥ध्रु.॥ तोडीं जाणिवेची कळा । होई वृत्तीसी वेगळा ॥२॥ तुका म्हणणे नभा । होई आणुचा ही गाभा ॥३॥