भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा

aisa chi to gova | na pahije kela deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥ बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥ध्रु.॥ आम्हांसी न कळे । तुम्ही झाकुं नये डोळे ॥२॥ तुका म्हणे संगें । असों एक एका अंगें ॥३॥