भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइकावी माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा

aikavi majhin kavatukauttaren | deuni sadaren chitta deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइकावी माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा ॥१॥ वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥ तुमचें न भंगे सर्वोत्तमपण । करितां समाधान लेंकराचें ॥२॥ तुका म्हणे जरी बोलतों बोबडें । तरी लाडे कोडें कवतुके ॥३॥