भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची

aikal pari aisen navhe bai | na sandavi soi bhratarachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची ॥१॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥