भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें

aika vachan hen sant | mi ton agala patit | kay kajen prit | karitasan adaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥ माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥ बहु पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥ सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥३॥ प्रियापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥ तोंड न दाखवावे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाठी लागला ॥५॥ पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज म्हणें यासाठी ॥६॥ सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा । तुका म्हणे भावा । साठी झणी घ्या कोणी ॥७॥