भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां

aika hen vachan majhen santajan | vinaviton jodun kar tumhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥ तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥ आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥ चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । म्हणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥ तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥