भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका हा शेवट अभंगमाळा झाली

aika ha shevat abhangamala jhali

ऐका हा शेवट अभंगमाळा झाली । तूर्या हेच आली प्रत्यया गा ॥१॥ तूर्या तेचि उन्मनी क्षर तें अक्षर । निर्गुण साकार ऐसें देखा ॥२॥ देह तें विदेह महाकारण ब्रह्म । हें निश्चयाचें वर्म ऐसें जाणा ॥३॥ कनक तेंची नग समुद्र तरंगीं । देह हा सर्वागीं ब्रह्म जाणा ॥४॥ अभंगा शेवट जाणे निवृत्ति एक । त्यानें मज देख कृपा केली ॥५॥ मूर्खासी हा बोध सांगों नये बापा । अभंग कृत्याचा लेश नसो हातीं ॥६॥ ज्ञानदेव म्हणे हें कृत्य हातां नये । माय देऊं नये कोणासही ॥७॥