भजनी मालिका
← भजनांकडे परत

आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें

ahmin patitannin ghalaven sankaden | tumhan lage koden ugavanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥ न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥ दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥३॥ तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंम्ही चि देवा ॥४॥