भजनी मालिका
← भजनांकडे परत

आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें

ahmin gaven tuhmin konin kanhin na mhanaven | aisen tanv amhan sangitalen nahin deven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न म्हणावें । ऐसें तंव आम्हां सांगितलें नाहीं देवें ॥१॥ म्हणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥ सहज घडे तया आळस करणें तें काई । अग्नीचें भातुकें हात पाळितां कां पायीं ॥२॥ येथें नाहीं लाज भक्तीभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रम्हहत्यापातक ॥३॥ जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥४॥ सदैव ज्यां कथाकाळी घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण ॥५॥