भजनी मालिका
← भजनांकडे परत

आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका

ahmin deton haka | kan re jalasi tun muka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥१॥ न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥ आधीं करूं चौघाचार । मग सांडूं भीडभार ॥२॥ तुका म्हणे शेवटीं । तुम्हां आम्हां घालूं तुटी ॥३॥