भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहेतें सकळ प्रारब्धाचे हातीं । यावें काकुलती यासी आतां

aheten sakal prarabdhache hatin | yaven kakulati yasi atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहेतें सकळ प्रारब्धाचे हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥१॥ ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥ अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥२॥ तुका म्हणे तुज ठेवावें पुजून । आणीक ते गुण नाहीं येथें ॥३॥