भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें

ahe ten chi amhi magon tujapashin | navhon tuj aisin kriyanashten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥ न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥ एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥ तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥३॥