भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा

ahe aisa dev vadavavi vani | nahi aisa mani anubhavava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥१॥ आवडी आवडी कलेंवरा कलेंवरी । वरीलें अंतरी ताळा पडे ॥ध्रु.॥ अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडून मागे तुटी हर्षयोगे ॥२॥ तुका म्हणे एके कळते दुसरे। बरियानें बरें आहाचे आहाच ॥३॥