भजनी मालिका
← भजनांकडे परत

आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प

agraha nanven pap | yogin sarave sankalpa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥१॥ सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥ तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥२॥ तुका म्हणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥