भजनी मालिका
← भजनांकडे परत

आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं

adnya paluniyan asen ekasaren | tumachin uttaren santanchin hin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आज्ञा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥१॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरी डोई येथुनें चि॥ध्रु.॥ येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥ तुका म्हणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥३॥