भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती

adhin nahi kalo ala ha upay | nahi tari kay chuki hoti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आधीं नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती ॥१॥ घालितो पाया सी मिठी एकसरे। नेदी तो दुसरे आड येऊं ॥ध्रु॥ कासया पडितो लटिक्याचे भरी । नव्हता कां शिरी भार घेतो ॥२॥ संसाराचा हाटक फिरतो दुकानी । भरोवरी धन मेळवीतो ॥३॥ तुका म्हणे कां हे घेतो गर्भवास । कां या होतो दास कुटुंबाचा ॥४॥