भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी

adhin cha alashi | vari gurucha upadeshi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥ मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥ नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥ तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥३॥