भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी

adharavanchuni | kay sangasi kahani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥१॥ ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रम्हज्ञान ॥२॥ तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥