भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधमाची यारी । रंग पतंगाचे परी

adhamachi yari | rang patangache pari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥२॥ तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥३॥