भजनी मालिका
← भजनांकडे परत

आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर

adakalen devadvar | vyartha kay karakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥ देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥२॥ राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥