भजनी मालिका
← भजनांकडे परत

अचिंत बाळक सावध जालें

achint balak savadh jalen

अचिंत बाळक सावध जालें । निशब्दी बोभाईलें मीचि मीचि ॥१॥ गरोदरेंविण बाळक जालें । माया मारुन गेलें निरंजना ॥२॥ तेथें एक नवल पैं जालें । पेहें सूदलें निरालंब ॥३॥ छत्तीस अकरा घोंट पैं घेतला । उदरेविण भरलें पोट देखा ॥४॥ सहज गुण होतें निर्गुण जालें । भलत्या झोंबलें निराकारे ॥५॥ बापरखुमादेविवरु शून्याशून्याहूनि वेगळे । त्या बाळका सामाविलें आपुल्या व्योमीं ॥६॥