भजनी मालिका
← भजनांकडे परत

आचरती कर्में । तेथें कळें धर्मोधर्मे

acharati karmen | tethen kalen dharmodharme

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आचरती कर्में । तेथें कळें धर्मोधर्मे ॥१॥ खेळे गोवळियांसवें । करिती त्यांचें साहावें ॥ध्रु.॥ यज्ञमुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥२॥ तुका म्हणे चोरी । योगियां ही सवें करी ॥३॥