भजनी मालिका
← भजनांकडे परत

अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते

achal na chale aisen jalen man | dharuni nijakhun rahilon te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निजखुण राहिलों ते ॥१॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥ एकविध भाव नव्हे अभावना । आणिक या गुणां न मिळवे ॥२॥ तुका म्हणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥३॥