भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं

abhinav sukh tari ya vicharen | vicharaven baren santajanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभिनव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥ रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥ पूजा तरि चित्तें कल्पावे ब्रम्हांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥ तुका म्हणे माझा अनुभव यापरि । डोई पायांवरी ठेवीतसें ॥३॥